पहिलं पाऊल
पहिलं पाऊल
1 min
912
नव्या जगाची ओळख, कोवळ्या डोळ्यांशी
भिजलेल्या अंधारात गाठ नवी सूर्य किरणाची
आयुष्याचं पहिल पाऊल मायेच्या पोटाशी
आनंदाच नात हे डोळ्यातल्या ओल्या थेंबाशी
नाजुक पायाची धाव ती पहिली
पावलावर पाऊल ठेवून जिद्द ती चालण्याची
हातावरची ती पहिली रेषा बाळपणाची
आशा ती ओठावरच्या ' आई ' शब्दाची
चेहऱ्यावरच गोड हसू , विसरवते दिशा दुःखाची
ओठावर हसू आणतं, साद ही प्रेमाची
ध्येय त्याला नसे काही,
ओळख फक्त मातृत्वाची
चौफेरी वेगळ्या दुनियेची,
ओढ त्याला जराशी
आयुष्य असं ते छोट्या क्षणांच
वाटते स्वप्न होत बालपणाचं
