STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

पहिली जाणीव

पहिली जाणीव

1 min
292

तू माझ्याबरोबर काही क्षण असतो

ते क्षणही, किती असतात सूखदाई

त्या क्षणानी हेलावून, जाते माझे मन....,,

व मी पाहात राहते स्वप्न

एखादया गोड उषेचे.........

जाणीव नाही मला या व्यवहारिकतेच्या जगाची......

का ? होतात मुग्धकळया, हसर्‍या माझ्या मनी

का ? जाते मी क्षणभर, भान माझे विसरुनी

तू.....बोललेल्या शब्दांचे वटवृृृृक्ष होतात......

माझ्या मनात.........अन् मी झुलत राहते

तुझ्या त्या क्षणाच्या आठवणीच्या हिंदोळयावर.....

दाटून येते मनात एक उत्कट माया

वाटत राहते मनाला ..........

करावा तुझ्यावर भावनाचा वर्षाव

वाहावी सूगंधीत भावनाची फूले तवचरणी

व मागावे एक सुंदर नातं

ज्यात नसेल स्वार्थ

नसावे जे जन्माने जोडलेले

नसावे त्याला कूठलेच लेबल

असावे फक्त ते भावनाचे..........

हो.......... असेच एखादे नाते असावे

कदाचित तीच प्रेमाची सूंदर

पहिली जाणीव ही असावी......


Rate this content
Log in