पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
244
सर्वांगास सौख्य
अवनीच्या देई,
पहिला पाऊस
थेंबसर येई...!!१!!
हळवा निसर्ग
भारावून जातो,
पानोपानी मुग्ध
बहरूनी येतो...!!२!!
सुगंध बेधुंद
दरवळ मनी,
ढगांतून अशी
हर्षाची पर्वणी...!!३!!
विसरत नाही
मनांतून कधी,
पहिला पाऊस
शांत सरींमधी.....!!४!!
अविस्मरणीय
अंतरीची खूण,
सुमधूर होई
जीवनाची धून..!!५!!
