STORYMIRROR

Babu Disouza

Others

2  

Babu Disouza

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
78

काळे काळे मेघ नभी गर्द दाटले

वा-यासही येण्याचे संदेश भेटले

घेत चाहुली लोळ धुळीचे उठले

पाऊस आगमनी साज सारे थाटले

-1-

मृदगंध भारावे, अनोखे वाटले

ओलावता आसमंत देणे फिटले

पाणवठी ये चर कुठले कुठले

तृष्णा शमन श्रेया भलते लाटले

-2-

प्रथम बरसल्या सरींनी बाटले

अंग अंग सारे रोमांचित पेटले

येता वर्षा प्रश्न जगण्याचे मिटले

देत दिलासा ऋतु संचित वाटले

-3-


Rate this content
Log in