STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
224

पहिला पाऊस, भिजलेली तू

 कोरडा मी अन् ओली तू

ती सर तुझ्या बटांवरून ओघळणारी

गालावरून फिरून तुझ्यात जिरणारी

अन् हळूच माझं काळीज चोरणारी

तो भन्नाट मृद्गंध बेधुंद करणारा

 तो बेभान वारा, तुझ्याकडे ओढणारा

 नकळत माझं तुझ्याकडे येणं

 माझ्या छत्रीत तुला सामावून घेणं

मनातून अलगद तुझे जीवनात झिरपत येणं

पहिल्या पावसाचं किती हे सुंदर देणं


Rate this content
Log in