STORYMIRROR

Vinita Kadam

Others

4  

Vinita Kadam

Others

पहाट झेंडा

पहाट झेंडा

1 min
344

माया आईची मोकळा श्वास

घेई आयुष्याची उंच भरारी

स्वच्छंद संगीतासवे जगणे

कधीच नव्हते कोणत्या आहारी....


पहाटेच्या साखर झोपेत

रोज उमले स्वप्न फुलोरा

खळाळतो यौवन किनारा

सोबतीस निसर्ग मनोरा.....


जीवनाच्या अर्ध्या वाटेवर

कोण श्वापद करी घाला

घृणास्पद नजरांच्या

जखमा होती काळजाला....


नाजूक कळी कुस्करूनी

निपजती हे कसे करंटे

स्त्रीत्वाचे तोडूनी लचके

रस्तोरस्ती फिरती सुरवंटे....


गल्लोगल्ली काळ सोकतो

निदर्शने , निषेध , मोर्चे काढूनी

वासनांध मने गोठलेली

आजही मोकाट फुले ओरबाडूनी....


फाडा बुरखे संस्कारांचे

आत्मपरीक्षण करा स्वत:चे

शिवरायांचे स्मरण करूनी

धडे गिरवा शिवसंस्कृतीचे....


स्त्रीजीवना पांढरा अंधार

थांबेल कधी आक्रंदन

घट्ट मनगटी पेटवा मशाली

एकजुटीने उठवू रणकंदन....


मन स्वच्छ अंतरी निर्मळ

नामशेष होई बलात्कारी लोंढे

उद्याच्या क्षितिजावर उगवेल

प्रसन्न पहाट भगवे झेंडे....


Rate this content
Log in