पेरणी
पेरणी
1 min
245
मृग नक्षत्राच्या सरी
आल्या साऱ्या धरेवर
चिंब झाली काळी आई
आला पाऊस भूवर...
सुखावला बळीराजा
पेरणीला सुरवात ,
करी आनंदाने राजा
जमिनीची मशागत..
झाली हो भुसभुशीत
सारी जमीन तयार ,
करी पेरणी बियांची
होई स्वप्ने हो साकार..
आता वाट पावसाची
पाहे माझा बळीराजा ,
कर धरा ओलिचिंब
वाट तुझी मेघराजा...
पीक येवो भरदार
एवढेच हो मागणे ,
कर सुख बरसात
हेच तयाला सांगणे...
