STORYMIRROR

Rajesh Varhade

Others

3  

Rajesh Varhade

Others

पेरणी

पेरणी

1 min
153

मेघ दाटले 

नभ उतरू आले 

पाहता-पाहता 

काळेकुट्ट झाले


विजांचा होईल 

गडगडाट जेव्हा 

बरसती धारा 

धरावर तेव्हा


शेतकरी दादा बी 

आणि बाजारात 

सज्ज होईल पेरणी 

करण्या मग्न होत


आनंदा चौकडे 

थंड वारा 

अंगाला भिडत 

आणतो शहरा



साहित्याला गुण द्या
लॉग इन