STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

पदर

पदर

1 min
12K

पदर आईचा

अत्यंत मायेचा

तान्हुल्याचा हक्काचा......


पदर आजीचा

अत्यंत उबीचा

प्रेमळ सावलीचा.....


पदर मावशीचा

आहे हक्काचा

आई नसतानाचा....


पदर अंगभर घेतला तर

कोण बाईकडे बघणार नाही

पदरात तर आहे बाईची लाज

तो वार्‍यावर सोडून चालेल का बाई....


लज्जा रक्षणार्थ बाईचा पदर

नाही अंग झाकून पदर घेतला

वाईट नजरा बाईवर पडल्याच

बाई देह तो पदरानेच तर नटला......


नको कपडे तोकडे घालू मुली 

सांभाळ पूर्ण स्वतःला तू बाळी

असे वागून तू काय मिळवशील 

होशील एखाद्या नराधमाची तू बळी.....


ऐन जवानीत आलीस तू पोरी

चापूनचोपून पदर घे छातीवरी

नको दाखवू तू तुझे रूपडे कुणाला

घात करतील वासनांध या भूवरी....


म्हणून मुली एकच सांगणे

नीटनेटके सदैव राहणे

नको कुणाचेही बोलणे

सदैव ताठ मानाने जगणे....


Rate this content
Log in