पदर
पदर
मोठी असे माझी सावली
भरजरी असे भाग्य भाळी
चंद्र्कोर मी हळूच रेखाटली
नथिचा मोती येई ओठावरी
जणू सांगे नाजुके नाती संभाळी
बाई मी मोठ्या घरची सुन हो
मोठी असे "ती "ची सावली
सोनेरी काठ पदर नक्षीदार..
नेसले पैठणी डोईवर पदर भारी
जणू पाठराखण मोरपीसि ही
नजरा तुझ्या तु सभांळी
नजरेने असे नको पाहू रोखूनी
बाई मी मोठ्या घरची सून हो
मोठी असे माझी सावली ही ..
रूप साजेसं लाजरी असे जरी
सोंदर्य असे की नसे कोणा मानी मी
चाल असे साजिशी राणी जणू राजाची
मानीनी मी स्वामिनी मी
बाई मी मोठ्या घरची सून हो
मोठी असे माझी सावली ही..
नजरेत ज्वालामुखीअसे
हृदयी माझ्या प्रित वसे
संस्काराची शिदोरी संगती
चालते संयमी मी जीवनी
भुलती जरी पाखरं तशी..
असे मान मज ह्या संसारी..
नको भुलूस माझ्या वरी
असे मी सून खाणदानी..
बाई मी मोठ्या घरची सून हो
मोठी असे माझी सावली ही...
