पडद्यामागची दैना
पडद्यामागची दैना
1 min
223
पडद्या मागची मंडळी
कोरोना काळात बिथरली,
न मिळे खाण्यास त्यांना
कामा वाचून राहिली..!!१!!
रंगमंच गाजवी कलाकार
पडद्यामागून चाले सारा खेळ,
करती रंगरंगोटी वेशभूषा
घालती सर्व कलाकारांचा मेळ..!!२!!
आज घडी आली अशी
कोरोनामुळे पडले उपाशी,
ना मिळे मदत यांना
घरच्यांची सतावे चिंता जशी..!!३!!
अशावेळी होऊन एक
करूया मदत अनेकांची,
कोणीही ना राहो वंचित
काळजी घेऊया सगळ्यांची..!!४!!
