STORYMIRROR

Umesh Salunke

Others

4  

Umesh Salunke

Others

पब जी पब जी खेळून येड लावून

पब जी पब जी खेळून येड लावून

2 mins
360

पब जी पब जी खेळून येड लावून

दवाखान्यात तस बोलतंय रावं

अजून तू सुधारला नाही भाव...


सांगून ऐकतं काय 

किती जणांनी समजुन ऐकत नाय

कुणी बोलून गेलं तरी उलट उत्तरं

दिल्याशिवाय रहात नाय 

जास्त मनाला लागलं रुसुन बसल्याशिवाय

पर्याय नाय.....


घरच्यांनी स्वतःच सोन्यावर लक्ष आहे का ?

बाजूचा सुम्यांनी वेड लाऊन कामावर लवकर

जातंय का.?मध्येच बाजूला घेऊन परंत पब जी

खेळतंय का.?


जागून दुसऱ्याना त्रासून अजून 

चार गोळा करून घरात बसतंय का.?


बस कर नाहीं थांब ना......

बस कर थोडं राहील ना....

बस कर घरी जाशील ना.....

बस कर जेवन करशील ना.....


स्वतःच्या मेंदूचा भुगा झाला तरी

घरच्यांच्या जिवावर जगुन आयुष्याची

बरबादी होऊन त्यांना दुःखात पाडून

किती तुझ्या साठी सेवा पुरवायच्या

उद्याच्य भविष्य अर्ध्या वर सोडून

स्वतःचं कमी वयात यमजवळ

जायची घाई तुला सोपी गोष्ट वाटते का.?


काय केले आईबापाने मोबाईल घेऊन

दिला म्हणजे ते दिवस रात्र रोजगार 

मिळतो का? बाप मिळेल तिथे काम करून मुलांसाठी त्यांची धडपड थांबते का?

थोडी तरी त्याला कवडीची लाज ठेवलीआहे का.?

त्याच्यावर धाऊन संपूण टाकायचा मनांत

विचार इतका किळसवाणा प्रकार मानस तू ठेवलाय का.?


सकाळ कधी होईल असं बघून

घरातली कामाला कधीं जातील याचा अंदाज घेऊन

पोरांचा घोळका जमून परंत चालु करून पोट भरत का नाय.


अरे ये लवकर

अरे ये सोन्या 

अरे ये मोन्या 

अरे ये पप्या

अरे ये सुम्यां

अरे ये अम्या

अरे ये सुर्या


जोडीदाराशी बोलणे:

मला पुरवठा झाला

शत्रू पुढे आहे

वाहनांचा शोध घ्या

सेफ झोनवर परत पडा

सेफ झोनवर जा

तेथे फक्त एक विजेता असू शकतो

माझ्या मागे ये

मला बंदूक पाहिजे

प्रथम श्रेणी मारुन टाका

हवेचे थेंब सोडा

काही अडचण नाही

गाडीत जा

मला खरच माफ कर......


काय अवस्था करुन घेतली बघितली का..

आपल्या देशात अशीच परिस्थिती निर्माण का..

खरं बोललं जर सख्या आईबापाने चांगलं सांगितले

रागाच्या भरात त्यांना संपून आनंद मिळेल का..

उद्या आपली जबाबदारी स्वीकारयाला कुणी सोबत

राहिलं का..


पब जी गरीब

पब जी श्रीमंत

पब जी पैसा

पब जी कॉइन

पब जी पॉईंट 


घरीं बसून आपली गुजराण करील ना

अरे मूर्खपणा करून स्वतः मनोरुग्ण

होऊन घरच्याच्या कमावलेल्या पैशात

तु दिवाळखोर असाच स्वर्गात जांशील

ना बाप जायच्या आधी तुझाच खांदेकरी

बनुन तुझ्या आठवणीत तो सर्वस्व गमावून

बसलं ना...


पब जी कंपनी कमवून स्वतःचं नवीन

मार्केट उभे केले ना. तु खेळून जीवाचं

रान करुन वेडसर झाला ना. आता 

तुला नीट जगता येणार आहें का?

तु फ़ाशी घेऊन पब जी कंपनी च

नुकसान होणार आहे का.?तुझ्या

घरच्यांना भरपाई किंवा तु खेळलेल्या

गेमचं सर्टिफिकेट येम तुझ्या घरच्यांना

देणार आहे का..


त्याला कुठे तुझी फ़िकीर

तो तूझी कुठे करतो कदर

तोच आपल्या सर्वाचा गॉडफादर......!


Rate this content
Log in