STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

पौर्णिमा

पौर्णिमा

1 min
278

सण नारळी पुनव

करु सागर पूजन

अती प्रेमाने सागर

करी सर्वांशी गुंजन।।१।।


मच्छीमार सागरात

वर्ष भर येती जाती 

त्याला प्रसन्न कराया

सारे नारळ वाहती।।२।।


दर्या राजा देव त्यांचा

त्यांचे करीतो रक्षण

त्याच्या कृपा प्रसादाने

अन्न करती भक्षण।।३।।


सण नारळी पौर्णिमा

भाऊ बहिणीचा सण

राखी बांधून भावाला

करी बहीण औक्षण।।४।।


सण राखी पौर्णिमेचा

आहे पवित्र नात्याचा

घट्ट नात्याला करतो

सदा धागा रेशमाचा।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन