STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

पौळ

पौळ

1 min
223

शेतात पौळ बांधली

सेतूच पौळ भासली ।।धृ।।

सवसांगी सळसळ

लांब लचक नागीन

मोठ्या तोर्यान चालली।।१।।

धुर्या धुर्यान राखन

मोती माणिकाचे भान

निसर्ग रुपी भारली।।२।।

सान थोरं गोलं गोलं

चप्पट लांबट ढोलं

राशीला राश ओतली।।३।।

गुरं ढोरं जनावरं

पौळ करीते जागरं

जागली अभंग पेरली।।४।।

थोरं शेतकरी मित्र

बिळ बहुं प्राणी मित्र

गाणी मैत्रिची गायली।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन