पैठणी..संक्रांत सुवसिनी..
पैठणी..संक्रांत सुवसिनी..
कांकण किणी किणी गोर्या हाती नक्षी मेंदीची
शोभुन दिसे ही सूवासनी, लेवून भाळी कुंकूम टिळा
नेसून पैठणी वसा जपशी राम सीतेचा संक्रांती दिनी
सजल्या सूवासनी पाहूनी जणू हसली ही धराही
बहरली रानफूले बघ ही ॠतू संक्रमित होतसे हा
नक्षत्रांचे रथ नभी चालू आकार घेतसे नव्याने सूरू
प्राजक्ताची माळ गळी पसरली सूगंधित अंगणी
रांगोळी नक्षीदार रंगी बेरंगी रेखाटते स्वागतासाठी खास
गारवा भोवताली रम्य दिवसाच्या
तीळगुळाचा नैवेद्य भर वाटीत चांदीच्या
वारसा समृद्ध सुखी संसाराचा.संक्रांती खरी गोडी संस्काराची
सदैव असूदे शिदोरी भरली नसो उणीव काही संसारी,
नांदो तीळगुळाचा गोडवा नको तंटा भांडण घरा...
अशीही संक्रांती लाभो सर्वांना भरून राहो गोण्या सुखांचे भांडार. .