पैसा
पैसा
1 min
176
पैसा म्हणतो माझा
करा नेहमी सदुपयोग।
योग्य ठिकाणी वापर करा
करु नका दुरुपयोग।
पैसा म्हणजेच असते लक्ष्मी तिचा
आदर, सन्मान, नेहमी करा।
करतात जे माझा चांगला वापर
टीकतो मी त्यांच्या घरात।
केला दुरूपयोग तर,
मी त्याच्याजवळ टीकत नाही।
चांगल्या कामासाठी वापरला तर
मी कोणालाही कमी पडू देत नाही
पैसे असेल जवळ तर
सगळेच हात जोडतात।
गरीब दिसला कोणी की,
नाक मुरडतात।
सगळ्या गोष्टींच म्हणे
घेता येत सोंग।
पैशाच मात्र घेता येत नाही
म्हणूनच वापरतात अशी म्हण।
