पायवाट
पायवाट
1 min
278
मला चालायचे आहे खूप दूरवर
मनात घेत अंदाज पायवाटाचा
कुणाची तरी मिळेल मला साथ
म्हणून रस्ता शोधतो पाउलवाटाचा
चालता चालता मिळाले संत ऋषी
त्यांनी दिली जगण्याची शिकवण
त्यांनीच सांगितलेल्या चांगल्या वाटेवर
चालू लागलो पावलावर पाऊल ठेवून
आदर्श व्यक्तिमत्त्व माझे आई-बाबा
त्यांच्या वाटेवर माझे पाऊल पडले
त्यांनी निर्माण केलेल्या वाटेवर
मला कसलेही त्रास नाही झाले
भाऊ-बहीण हे ही होते माझे मार्गदर्शक
यशस्वी जीवनात त्यांचा ही आहे वाटा
ओळखी अनोळखी मित्राच्या मदतीने
जीवनात निर्माण झाल्या आनंदाच्या लाटा
