पावसातला निसर्गनजारा
पावसातला निसर्गनजारा
1 min
230
बरसत आल्या ह्या जलधारा
नभोमंडपी लखलखाट अन् वारा
हरिततृणांची लेऊन चादर
फुलवित मनांत मोरपिसारा
इंद्रधनुचे सप्तरंग तरंगती
जणू छत्री धरली अवनीवरती
रंगछटा मोहक खुलून दिसती
कोसळणाऱ्या मेघांभोवती
क्षणांत होतो अंधार गडद हा
क्षणांत लख्ख प्रकाश पहा
श्रावणसरींचा खेळ सारा
पावसातला हा निसर्ग नजारा
