पावसाने केली भलतीच कमाल
पावसाने केली भलतीच कमाल
1 min
294
पहिला दिवस शाळेचा
मित्रासंगे खेळायचा
आमचे झाले खूपच हाल
पावसाने केली भलतीच कमाल ।।
शाळेमध्ये धिंगा मस्ती
वर्गामध्ये केली कुस्ती
बाईने धरले आमचे गाल
पावसाने केली भलतीच कमाल ।।
सरसर धारा पावसाच्या
येऊन आम्हा भिजवायच्या
आभाळाचा तुटला व्हॉल
पावसाने केली भलतीच कमाल ।।
आला पाऊस भिजली शाळा
मुले सारी झाली गोळा
गोळा होवून धरला ताल
पावसाने केली भलतीच कमाल ।।
सोसाट्याचा आला वारा
वाऱ्यासंगे आल्या गारा
पोरांचे मग झाले बे हाल
पावसाने केली भलतीच कमाल ।।
