पावसाच्या सरी
पावसाच्या सरी
1 min
458
आल्या पावसाच्या नटखट सरी
नेसली धरेने हिरवी भरजरी
मुकुट डोईवर चमके धुक्याचा चंदेरी
ओलाचिंब वारा धाव घेई रानावरी
हरीततृणांचा सृष्टीने ओढला शेला
चमकती त्यावरी रंगेबीरंगी रानफुला
मंद सुगंध दरवळे तृणाला
ढग करीत गुजगौष्टी हसवी सुमनाला
दरी खोरे हि निनादती पावसाच्या सरींनी
बोलु लागली झाडे या आनंदी क्षणांनी
तोडून मौन खळाळती झरे अनेक दिवसांनी
शेत शिवारे सजवीली वृषभ आणि कष्टकऱ्यांनी
ओढ प्रियवराची नववधुस जशी
धुंद वारा वाजवी बासरी कृष्णा अशी
सौंदर्याचा अतुट मेळ घालतो निसर्गाशी
चातकाप्रमाणे अवनीची हि प्रित पावसाशी
