STORYMIRROR

प्रविण कावणकर

Children Stories Romance Action

2  

प्रविण कावणकर

Children Stories Romance Action

पावसाच्या पहिल्या सरी

पावसाच्या पहिल्या सरी

1 min
77

भरून आले बेधुंद ढग 

चमकल्या विजेच्या तारा

वाऱ्यासंगे येणाऱ्या गारा

थेंबांनी मातीचा सुगंध वारा...


टप टप थेंब छतावर 

अलगद मोहून बरसतो

पाने फुले भिजून जाती

ओला चिंब रान बहरतो....


मनाची तगमग चाहूल 

लागते रिमझिम सरीची

अंगणात भरलेलं पाणी.

मुलं आनंदात भिजायची....


नदी नाळे ओढे वाहती

दूरवर थेंबांनी भरते पाणी

मोर नाचरा पिसारा डोलतो

मंजुळ वारे झुळूक वाणी.....


हवाहवासा वाटणारा

पाऊस पुन्हा पुन्हा यावा

येणाऱ्या दिवसात सरी

बरसत्या चिंबचिब फुलावा....


Rate this content
Log in