STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

पावसाचं गुपितनाट्य....

पावसाचं गुपितनाट्य....

1 min
222

अवकाशाचा सुखावणारा नजारा

थंडावणारा मंद मंद झुलवणारा वारा

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट

ऊन-पावसाच्या खेळात डोकावणारा


कधी नूसताच टिपटिप बरसणारा

कधी रिमझिम चाहूल देणारा

कधी खट्याळ हुलकावणी देणारा

कधी वाट पाहणारा चातक बनवणारा


शुष्क वातावरणाला त्यानं द्यावा दिलासा

आलंच मनात तर रडावं ढसाढसा

जुळलाच योग तर न्हाहून टाकावं धो धो

आलंच उधाण तर त्यानं घ्यावं थोडं सबुरीनं


नको असावा आग ओकणारा आतंक बुडवणारा

रुष्टता म्ह्णून त्यानं धरावं अबोल मौन कधी

'ये रे ये रे पावसा' नको नूसताच अविचारी कल्ला

कोसळावं मुक्त थिजवणाऱ्या विचारांनी कधी


पावसाचं गुपितनाट्य चालतं विचित्र फार

सगळा मनाचाच असतो कारभार

सतत कोसळून पंचायत असते असण्याची

पण होऊदे खळखळता झरा पुन्हा जिवंत जरा


Rate this content
Log in