पावसाचं गुपितनाट्य....
पावसाचं गुपितनाट्य....
अवकाशाचा सुखावणारा नजारा
थंडावणारा मंद मंद झुलवणारा वारा
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट
ऊन-पावसाच्या खेळात डोकावणारा
कधी निसताच टिपटिप बरसणारा
कधी रिमझिम चाहूल देणारा
कधी खट्याळ हुलकावणी देणारा
कधी वाट पाहणारा चातक बनवणारा
शुष्क वातावरणाला त्यानं द्यावा दिलासा
आलंच मनात तर रडावं ढसाढसा
जुळलाच योग तर न्हाऊन टाकावं धो धो
आलंच उधाण तर त्यानं घ्यावं थोडं सबुरीनं
नको असावा आग ओकणारा आतंक बुडवणारा
रुष्टता म्हणून त्यानं धरावं अबोल मौन कधी
'ये रे ये रे पावसा' नको नुसताच अविचारी कल्ला
कोसळावं मुक्त थिजवणाऱ्या विचारांनी कधी
पावसाचं गुपितनाट्य चालतं विचित्र फार
सगळा मनाचाच असतो कारभार
सतत कोसळून पंचायत असते असण्याची
पण होऊ दे खळखळता झरा पुन्हा जिवंत जरा
