Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sayli Kamble

Others

4  

Sayli Kamble

Others

पावसाचे थेंब

पावसाचे थेंब

1 min
90


टिप टिप थेंबांनी झाली पावसाला सुरूवात

ते झेलण्यास आपोआपच केला मी पुढे हात


त्यांचा हा स्पर्श कसा मनालाही थिरकावतो

मनात लपलेल्या भावनांना पुन्हा एकदा जागवतो


मग वाटते थांबूच नये, तो पाऊस नि उफाळून आलेल्या भावना

दोघांची एकत्रित अनुभुती हि जणू आठवण सुंदर क्षणांना


पावसाचा वेग हा कमी अधिक होत राहतो

पावसाला न्याहाळणार्या डोळ्यांनाही तो सुखावतो


मग मनही होते शांत जसा पाऊस थांबू लागतो

दरवर्षी येऊनही पाऊस त्याचे नाविण्य कसे जपतो 


Rate this content
Log in