पावसाचे दागिने
पावसाचे दागिने
1 min
305
*पावसात भिजताना,*
*एक थेंब अंगावर,*
*मनातल्या शिंपल्यात,*
*साठवला क्षणभर!*
*मोती बनताच त्याला,*
*अलगद जडवला,*
*हृदयाच्या कोंदणात,*
*आठवांत सजवला!*
*सर एक पावसाची,*
*ओंजळीत बरसली,*
*सर तिची गळ्यातली,*
*माळण्यास नटवली!*
*गारा गोळा केल्या, त्यांचे,*
*बाजूबंद घडवले,*
*ओल्या मातीचे पैंजण,*
*त्यास पायात बांधले!*
*इंद्रधनुषाच्या अंती,*
*पहा कित्येक खजिने,*
*त्यातूनच पावसाचे,*
*सारे बनले दागिने!*
*अशा जवाहिरांसवे*
*आल्या पहा मृगधारा*
*मृदगंध आसमंती*
*आज पसरला सारा*