STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

पावसाचे आगमन

पावसाचे आगमन

1 min
344

मन पाऊस पाऊस कसा

शब्दावाचून सांगुन गेला

सूर सुगंधी मुग्ध मातीचा

हर्षवी क्षणात तनामनाला....


साक्षात्कार तो पावसाचा

कणाकणात सुरम्य भरला

ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला

हिरवळतो साऱ्या पृथ्वीला.....


पावसाचा महिमा गाती सृष्टी 

कसा कुणी तो वर्णावयाचा

सुगंधी मृदगंधीत पाऊस

तनामनात भरवण्याचा......


त्रिभूवन दरवळतो गंधाराने

सरिताही मदमस्त वाहती

निसर्ग फुलते यौवन घेवुनी

अद्भुत लीलया दाखविती......


ऋतु हिरवा ऋतु बरवा झाला

गीत गाती पशुपक्षीही सारी

लता-वेलीही मोहरून जाती

पावसाचे आगमन देई तरतरी.....


धरती-पाताळ-नभात भरूनी  

पुन्हा नव्याने आशा स्फुरती 

चिंबचिंब न्हाऊनी मन हे 

पावसात तृप्त होती.....


नभी मेघ निनाद गर्जुन भारी

सनई, चौघडे,पखवाज वाजती

पावसाचा स्वैर इशारा होता

रवि-शशीही वेडावून जाती...



Rate this content
Log in