Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepa Vankudre

Others

3.2  

Deepa Vankudre

Others

पावसा कधी कळेल तुला.....

पावसा कधी कळेल तुला.....

1 min
242


पावसा कधी कळेल तुला, थांग माझ्या जीवाचा, 

पावसाचे थेंब शमवतील का दाह माझ्या आसवाचा! 


पावसा कधी कळेल तुला, वेग माझ्या भावनांचा, 

भार सोसवेल का तुला, वाहणा-या माझ्या कवनांचा!


पावसा कधी कळेल तुला, किती आठव भिजले,

साचविलेस डबके पाण्याचे, सारे तिथेच थिजले!


पावसा कधी कळेल तुला, बीज प्रेमाचे पेरले,

इतका बरसलास की वाहून गेले, काही न उरले!


पावसा कधी कळेल तुला, पूर आणलास चोहिकडे, 

कधीच कळणार नाही का तुला, माझे मन मात्र कोरडे!


Rate this content
Log in