Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

पाऊसधारा

पाऊसधारा

3 mins
83


१)

पाऊसधारात मी बाहेर पडले

थेंबोथेंबी पावसात चिंब भिजले

अंगी थेंब थेंब निथळले

सजणाने मला लांबूनच पाहिले

त्याचे मन झुल्यावर झुलले

गगनात भरारी घेवू लागले

दिसताच मी सामोरी

आली साजणाला प्रेमाची उभारी

साजणाने तशीच घेतली मिठीत

खूप खूप अति आनंदात

केला माझ्यावर वर्षाव प्रेमाचा

दोघांनी घेतला मोद सुखाचा

या टपोर्‍या थेंबांच्या पाऊसधारात

घडले जे नको होते आनंदाच्या भरात.....


      २)

मनसोक्त बरसतात पाऊसधारा

चिंब,चिंब भिजली वसुंधरा

गुज कानी काल सांगून गेला 

अवखळ,अल्लड रानवारा ....,

पारिजातकाचा गंध पसरला

पृथ्वीवर फुलांचा सडा शिंपडला

पाऊसधारा येती झराझरा

वसुंधरेवर पडती टपोर्‍या गारा..

वसुंधरा सजली,चिंब झाली

पाऊसधारात मुक्याने भिजली 

हिरवा शालू पांघरली

दवबिंदूने शहारली....


3)

धो धो धो धो पाऊस आला

सुट्टी मिळाली शाळेला

सर्व मुलांना आनंद झाला

मुले नाचती आनंदात

चिंब चिंब भिजती पावसात

पाणी वाहे रस्त्यात

मुले नावा सोडती पाण्यात......

धो धो धो धौ पाऊस आला......


कड कड कड कड मेघ गर्जती

चम चम चम चम वीज चमकती

थुई थुई थुई थुई मोर नाचती

हे पाहून मुले उड्या मारती

धो धो धो धो पाऊस आला


थप थप थप थप चिखल तुडवूया

चिखलातून घसरगुंडी खेळूया

खूप खूप खूप खूप मजा करूया

पावसाचा आनद घेवूया....

धो धो धो धो पाऊस आला....


भूर भूर भूर भूर पक्षी विहरती

आला वारा झाडेझूडपे डोलती

थड थड थड थड थंडी वाजती

घरी जावूनी स्वच्छ होवूया

गरमागरम भजी खावूया.... 

धो धो धो धो पाऊस आला......

      


Rate this content
Log in