पाऊस
पाऊस
1 min
249
विजांचा लखलखाट,
ढगांचा गडगडाट
सु, सु गार वारा
टप, टप जलधारा//१//
झाडांचा डोलारा
मोराचा पिसारा
वाजतो नगारा
आसमंत प्रसन्न सारा//२//
माती ओली
चिंब न्हाली
शांत, सारे रान
पडलं कोवळ उन//३//
कुहू, कुहु कोकिळा
गाती आनंद सोहळा
ओढा वाहिला
स्वच्छंद पाऊस बरसला//४//