पाऊस
पाऊस
ढग नभात दाटले
काळोखले सारे आकाश
वारा सुटला आसमंत
आता पडेल पाऊस..
धारा बरसती धरणी
आल्या सरीवर सरी
झाली ओलीचिंब धरती
डुले आनंदे पिकपाणी..
झाले हिरवे रानमाळ
सजली धरणी वधुसमान
शालू हिरवा लेवून
पाहे वाट इंद्रधनू नभात ..
सळसळती पाऊस धारा
रानामंधी पानोपाणी
विसावले पशुपक्षी
झाड, पाना-फांद्यावरती..
गायी हंबरती पळे
वासरांच्या भेटी लागे
गळी घंटा, घुंगाराचा
नाद गुंजे चहूकडे..
शेत - चाकरी निघाले
औत सोडून बैलांसवे
डोई घोंगट ,घोंगडी
खांदी तुत्यासंगे जुफने..
पाट वाहे शेतांमधूनी
ओढे , नाले खळखळती
हिरवे सपन नयनी
भारी सुखावला धनी...
