पाऊस
पाऊस
1 min
174
पाऊस कसा टिपटिप पडे
बघन्यास मन होई बावरे
पाऊस कसा रिमझिम पडे
अंगावर उडती थंड शहारे.
पाऊस येता झाडे डोलती
त्याच्याचं आनंदाने जणू नाचती
विजाही मग चमचम करती
जनु या सार्यांचा फोटो काढती.
पाऊस येतो मग असा कसा
कधी येतो गरजून बरसतो
सांगे मग तृप्त धरणीला
तुला आज भिजवून टाकतो.
पावसाचे मोती चमकते कसे
जनु झांडावरती चांदणे उतरते
डोलती मग पाने-फुले
भिजलेले मन कसे हर्षते.
पहिल्याच या पावसात
धरती दरवळते नव्या सुगंधात
एक नविन स्वप्न जसे
उभारी घेचं हळूचं मनात.
