STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

पाऊस

पाऊस

1 min
238

काळ्या काळ्या मेघांनी केली धमाल

पावसाने केली भलतीच धमाल..

धो धो पडला अचानक क्षणात

वारा बोलतोय छानदार कानात

भिजून होवूया साथी हो बेहाल

पावसाने केली भलतीच कमाल....


खूपच हौस पावसात भिजण्याची

मुसळधार पावसाची गंम्मत पाहण्याची

ज्येष्ठांचे होतात हो पुरे हालेहाल

पावसाने केली भलतीच धमाल....


मयुर नृत्य करी फुलवी पिसारा

भुईवर पडतात टपोर्‍या गारा

परीने घातलाय झगा लालेलाल

पावसाने केली भलतीच कमाल....


मुलांनी सोडल्या जलात नावा

पावसात फिरले हो गावोगावा

केला मुलांनी खूपच बवाल

पावसाने केली भलतीच धमाल....


साहित्याला गुण द्या
लॉग इन