STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Others

3  

सुमनांजली बनसोडे

Others

पाऊस...

पाऊस...

1 min
188

काय सांगू राव 

आमच्या गावात पाऊसच नाय. 

काळ्या जमिनीला जशा.

तशा काळजाला भेगा हाय..

काय सांगू राव .... 


विहिरीला पाणीच नाय...

डोळ्यात मात्र अश्रू हाय ..

ढसाढसा रडते धरती माय... 

काय सांगू राव....


डोईवरला सूर्यच काय

पाया खालची जमीन ...

तापलेली हाय....

सुकलेले ओठचं काय... 

आटलेले पोट ही हाय...

काय सांगू राव....


सुकलेले पानवठेच काय...

पाऊलवाटा ही सुन्या हाय...

पाखरांचा चिवचिवाटच काय 

गावातही शुकशुकाट हाय...


कुणाचाच जीवात जीव नाय 

पण गळ्याला मात्र फाशी हाय 

हे सगळ हाय आमच्या गावात 

कारण .. आमच्या गावात पाऊसच नाय

सारं कस कोरडंठाक हाय... 


Rate this content
Log in