पाऊस
पाऊस


रिमझिम पावसात
मी बाहेर पडले
थेंबोथेंबी जलधारात
चिंब चिंब भिजले...
साजनाने मला
लांबूनच पाहिले
मन त्याचे प्रीतीच्या
झुल्यावर झुलले....
दिसताच ओलेती समोरी
साजनाच्या की आली
प्रेमाला हो उभारी
लाज आली माझ्या गाली....
साजनाने घेतली मला
तशीच ओलेती कुशीत
मग मी पण आले
प्रीतीच्या छान खुशीत.....
वर्षाव केला साजणाने
प्रीतीचा आणि प्रेमाचा
दोघांनी मग घेतला
मोद क्षणिक सुखाचा.....