पाऊस
पाऊस
1 min
433
पहिला पाऊस अन् मातीचा हा सुगंध
मनमोहून निघावं त्यात होऊनी बेधुंद
सरी सरसरत स्वच्छंदी बरसल्या
थोडा गाराही खाली उतरल्या
तो गारवा जाणवावा वाऱ्याचा
त्यात सोबतीला फवारा पावसाचा
ओलेचिंब ओठ झाले
स्पर्श हा त्याचा नयनी होता
आनंद मजला सांगावे किती
पहिला पाऊस जमिनीवर येता
