STORYMIRROR

Saroj Gajare

Others

3  

Saroj Gajare

Others

पाऊस

पाऊस

1 min
904


' पावसाची रूपं वेल्हाळ '

कधी प्रेमळ तर कधी खट्याळ

कधी नाठाळ होऊन येतो पाऊस ।।


कधी नाजूक रिमझिम सरी बरसत

मातीस भिजवीत येतो पाऊस ।।


कधी उधाणत , कधी रोरावत

हस्ताचा धुडगूस घालितो पाऊस ।।


कधी आशा पेरत कधी आस लावत

आसळकाचा येतो पाऊस ।।


कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी

मघा सासवांचा येतो पाऊस ।।


कधी भिजका तर कधी सोशिक

कधी उद्वेग आणतो पाऊस ।।


कधी ऊरी फुटतो कधी दडी मारतो

पूर्वा फाल्गुनी सुनांचा पाऊस ।।


कधी तरसवतो कधी नासवतो

कधी गोठवतो रब्बीचा पाऊस


कधी न्हाऊ घालितो प्रणय सरीत

कधी दर्शन इंद्रधनुष्य सप्तरंगात ।।


अस्सा पाऊस सर्वा वेड लावितो ,

चराचर सृष्टीला जीवदान देतो ।।


Rate this content
Log in