पाऊस
पाऊस
1 min
82
पाऊस कसा टिप टिप पडे
बघन्यास मन होई बावरे
पाऊस कसा रिमझीम पडे
इमगावर उडती थंड शहारे.
पाऊस येता झाडे डोलती
त्याच्याचं आनंदाने जनू नाचती
विजाही मग चम -चम करती
जनू या सार्याचा फोटो काढती.
पाऊस येतो मग असा कसा
कधी येतो गरजून बरसतो
सांगे मग तप्त धरनीला
तुला आज भिजवून टाकतो.
पावसाचे मोती चमकती कसे
जनू झाडांवर चांदणे उतरते
डोलती मग पाने फुले
भिजलेले मन कसे हर्षते.
पहिल्याचं या पावसात
धरती दरवळते नव्या सुगंधात
एक नवीन स्वप्न जसे
उभारी घेतं हळूचं मनात.
