पाऊस पडत होता तेव्हा
पाऊस पडत होता तेव्हा
1 min
249
टपटप पाऊस पडत होता
विचाराने मन अथांग भरलेल मन माझं रडत होत पावसाबरोबर ते वाहून गेल
कुणाला कळले नाही रडत मी होते
मनावरचे ओझे होते विचारांचे
ते अश्रुंसोबत वाहून गेले
रस्त्यावर पडलेल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर
वाहून गेले मन हे माझे
वाहणाऱ्या प्रवाहाबरोबर मनही स्वच्छ झाले
प्रवाहात कोणाला न कळले मन माझे
रस्त्यावर पडणाऱ्या चकाकणारी ही किरणे
करून आल्हाददायक फुलुनी मन माझे
येऊनी कानात माझ्या सांगती ही किरणे
उठ आता नको रडूस, तुझ्याकडे वाढून ठेवली
नवी किरणे नवतेजाने नवा प्रवाहाने
