पाऊस धारा
पाऊस धारा
1 min
265
मन हे अधिर आतुर
धरी पावसाची सर
किती आवरुनी धरा
छत्री भिजण्या आतुर
चिंब पावसाची सर
आठवणी च काहुर
मन होतसे अधिर
ओली पापणी लकेर
आल्या कुठुनश्या भूवरी
ओल्या पावसाची सर
चिंब गंधाळली स्वराली
गीतातही भरे कापर
जाहली प्रफुल्लित धरा
मृदगंध दरवळे सारा
परिमळे हा गार वारा
मनी नाचे मोरपिसारा
आल्या कुठुनश्या त्या सरी पावसाच्या
करी प्रफुल्लित तहानलेल्या धराला
मृदगंध दरवळे सारा पसरे हा गार वारा
मन होई गंधित गारवा
रानीवनी मोरपिसारा नाचाला...
