पाऊस ढगाआड लपला
पाऊस ढगाआड लपला
1 min
116
दाटले मेघ काळे जांभळे
सुटला वाराही सोसाट्याचा
पाऊस ढगाआड लपला
विजांचा होता थयथयाट
मी वरुणाचा मंत्र जपला
तपमानात प्रचंड वाढ
ओसाड डोंगर रानोमाळ
अंगाची होतेय लाहीलाही
बळीराजाचा पारा चढला
पोटापुरते मिळेना काही
दया येऊ दे रे दयाघना
बरस आता सावळ्या मेघा
भेगाळली पाण्याविना भूमी
जगतील कसे जीव येथे
पशू, पक्षी, मानव वा कृमी
