STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Others

3  

Author Sangieta Devkar

Others

पाऊस बनुया

पाऊस बनुया

1 min
170

चला जरा आज लहान होऊयात.

चिम्ब चिम्ब या पावसात भिजुयात.

पुन्हा ती कागदाची बोट,

पुन्हा ये रे ये रे पावसा म्हणूयात.

कशाला उद्याची चिंता,नको कशाची काळजी,

पावसाच्या या सरीत सव्ताला विसरुयात.

एक एक थेंब पाण्याचा ओंजळीत झेलूयात.

पावसाच्या सरी अंगावर मिरवुयात.

तेच आहे जगणे रोजचे,आज सव्हताला जरा शोधुयात.

पाऊस बनून आज पावसा सोबत जगुयात.

नको आज रडने नको आज मनाला कुपंन,

कोरडे मन कोरडया व्यथा,जरा आतून ओले होऊयात.

तो असाच आहे भुलवनारा,मनामनात रुजनारा,

साऱ्या सृष्टिला त्याचच वेड लावणारा.

मग चला तर आपण ही आज थोड़ वेडे होवूयात.

पाऊस बनून त्या पावसात चिंब चिंब भिजुयात.

दु:ख सारी विसरून चला खळखळुन हासुयात.

आयुष्याला पुन्हा एकदा हिरवळीने नटवुयात.


Rate this content
Log in