पाऊस आला
पाऊस आला
1 min
261
धडाम धुडूम धडाम धुडूम ढगांचा बाजा रे,
झिम्माड चीम्माड झिम्माड चीम्माड पाऊस आला रे,
सरीवर सरी येता डोईवरी आनंदी मन रे,
सरी पानांवर सरी फुलांवर ओलेते वन रे,
सुई सुई करी वाहे भुईवरी ओला वारा रे,
थुई थुई करी नाचे तालावरी मोर रानी रे,
मळ्यात पाणी न ताल्यान पाणी आनंद उरी रे,
पाणावलं रान पाणावलं मन आनंदी धरा रे,
भिजते तन न भिजते मन अशी थंडी भरे रे,
झिम्माड चीम्माड झिम्माड चीम्माड पाऊस आला रे...
