STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

पाऊले चालती पंढरीची वाट

पाऊले चालती पंढरीची वाट

1 min
340

आषाढी कार्तिकी भक्तजन चालती

विठ्ठलदर्शना मनोभावे पंढरीसी जाती

एकमेका ठायी वसे दया, क्षमा, शांती

अथक चालती पाऊले कधी घेत विश्रांती


भजन, भारूड, नर्तन, अखंड हरिनाम ते संकीर्तनात

दिंड्या, पताका, टाळ हाती वीणा तल्लीन होती किर्तनात


भक्तांसाठी देव भावाचा भुकेला

म्हणून विठ्ठला त्याचे नाव

पंढरपुरासी तयाचे वास्तव्य अलंकापुरी असे त्याचे गाव


विठ्ठल दर्शनाचे लागते वेड ते अपार

वारीमध्ये सहभागी होती सोडुनिया असार


तुझ्या दर्शनासाठी त्यांची असे रे तळमळ

देई त्यांना दर्शन करी मन त्यांचे अचपळ


Rate this content
Log in