STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

4  

Meena Mahindrakar

Others

पाऊल

पाऊल

1 min
23.2K

तुझ्या आगमनाची 

लागली चाहूल 

बदलून गेले जीवन 

अडकले बंधनात पाऊल 


तुझ्या नाजूक पावलांनी 

अंगण माझे व्यापले 

हरकले मनी मी 

कुंपण मायेचे घातले 



मायेच्या कुंपणात 

झाला तू परावलंबी 

मला मात्र माझा बाळ 

हवा तो स्वावलंबी 



हातातला हात तुझ्या 

घेतला मी सोडवून 

जीवनातील रस्त्यांची 

दिली ओळख करून 



नाजूक पावले तुझी 

लागली रस्त्यावर धावू 

यश-अपयश जीवनातले 

लागला सर्व साहू



यशाच्या शिडी तू 

चढला भराभर 

आनंद झाला मनी 

माझ्या खरोखर 



आता वाटतं तू 

थोडं थांबून द्यावं 

मागे वळून थोडंसं 

परत अंगणी माझ्या 

दुडूदुडू धावाव.



Rate this content
Log in