पाठीराखा
पाठीराखा
1 min
363
सण भाऊबीज
आला आनंदाचा,
भाऊ बहिणीच्या
निस्वार्थी प्रेमाचा...१..
बहीण आनंदी
दिन हा दिवाळी,
शुभ मांगल्याचे
भावास ओवाळी...२..
आयुष्य वाढावे
आपल्या भावाचे,
प्रार्थना करते
बहिण यमाचे...३..
बहिणीच्या हाती
गोडधोड खाई,
पवित्र दिवशी
आशीर्वाद घेई...४..
वस्त्रालंकाराने
ताईस मडवी,
नाजूक नात्यास
प्रेमाने घडवी...५..
भाऊ पाठीराखा
आठवण ठेवी,
संकटा समयी
सदा उभा राही...६..
हेच खरे नाते
जपू पावित्र्याचे,
जगा वेगळे हे
महत्व सणाचे...७..
