पार्टीचा मेनू
पार्टीचा मेनू
नव्या पिढीच्या नव्या आवडी
भाजी भाकरी नकोच खिचडी
भेळ मांचुरियान भजी सूप,
राईस,कटलेट,वेज नॉन वेज,
धोकादायक चिनी मीठ
ठरती पार्टीचे मेनू.**1.
घरात खाती रस्त्यावर
गाडी गटाराच्या काठावर.
तिखट तेही लागे गोड.
केव्हा पचते कधी बाधा होते.
उग्र दर्प किती ते ही रुचत राहते.
नुडल्स सारे आवडतात.
शेवया तर त्या असतात.
पण खीर नावडे चविष्ट मॅगी.
स्टॉल लागती जागोजागी.
भेसळ दर्जा कुणा कळेना.
आम्हा रूचेना असला खाना.
भारतीय तो कच्चा माल.
चीन करते त्यावरी धमाल.
काय सकसता त्या अन्नात
देशी अपुले पदार्थ खावे.
सांगा की या तरुणांच्या कानात.
देश प्रेम जागवा मनात.