पारिजातकाचा सडा
पारिजातकाचा सडा
1 min
467
शुभ्र फुलांनी बहरे
अंगणात पारिजात,
मंद सुगंध पसरे
वाटे प्रसन्न घरात...१..
सडा पारिजातकाचा
झाडाखाली पसरून
नाजूकता गुणधर्म
पडे सहज गळून...२..
दरवळे परिसर
गोड अशा सुवासाने,
फुल भासते स्वर्गीय
रंग रूप आकाराने...३..
फुले पांढरी पिंगट
प्रिय देवांना आवडे,
वाही सुमने पूजेत
शांती दाटे चोहिकडे...४..
सौंदर्याचे प्रसाधन
सगळेच उपभोगी,
बहुगुणी आहे फुल
लाख मोली उपयोगी...५..
