पाणी
पाणी
1 min
41
मैना राणी गाते मधुर गाणी
झूळझूळ वाहते मंजुळ पाणी||धृ||
रानीवनी झाडवेली बहरली
मनमयूर हिरवळीला साद घाली
मनाचा झुला झुलला पानोपानी
झुळझुळ वाहते मंजुळ पाणी||1||
साथ हवी मजला सख्या तुझी
प्रीत फुलेल मंदमधूर सांझी
आणखी ना काही हवे जीवनी
झूळझूळ वाहते मंजुळ पाणी||2||
सृष्टी सारी सप्तरंगी रंगली
रम्य रूपात अनोख्या सजली
निसर्ग हुंकार येतो मम् कानी
झूळझूळ वाहते मंजुळ पाणी||3||
मैना राणी गाते मधुर गाणी
झूळझूळ वाहते मंजुळ पाणी||धृ||