STORYMIRROR

प्रमोद राऊत

Others

4  

प्रमोद राऊत

Others

पाणी

पाणी

1 min
124

नभातुन कोसळतो तेव्हा त्याला पण

खुप सोसावे लागत त्यावर कोसळुन नुसत

थांबता येत नाही येताना एकटा असतो तेव्हा

गरज असते साथीदार सगळे थेंब सारखेच

गोळा करतात नभातुन खाली आल्यावर

एक एक जोडीदार त्याच्या विश्वासात

चालत राहतातपुढे मग डोंगरावरमाथ्यावरून

सुरू होतात बंधमुक्त होऊन पुढे

जाण्यासाठी मग कधी गवत पानं झाडं फुलं

किती किती जण आतुरतेने वाट

बघत असतात चातक सारखी तेव्हा

त्यांना करावी लागते एकच धिटाई

न थांबता सतत पुढं पुढं जात

राहायचं कोणाचा रंग आला तरी त्याच्यात नाही

राहायचं बस आपलं अस्तित्व निर्माण करायच

ह्यातच सुरवात होते ती खळखळून वाहायला

मग काय ओढे नदी भरायला सुरवात

येणाऱ्या अडथळ्यांना फेकुन देत

फक्त पुढं पुढं जायचं सागराच्या मिठीत जाऊन विसवायचं

पण त्याच्या लाटा विसावू देत नाही

ढकलून ढकलून देतात किनाऱ्यावर

नेऊन आदळतात परत आत घेण्याची आशा

तरी नाही पाण्याची निराशा


Rate this content
Log in