पाणी
पाणी
1 min
474
सृष्टीच्या अंतरंगात
जलाविना तडपतो मासा
सोडून नाही जाणार
घेतो हा वसा
हवेत उडणाऱ्या विहगात
चातकाचे ही असेच असते
पावसाच्या सरी शिवाय
तहान भागत नसते
भूतलावर तर
गोष्टच आगळी
सर्व कामांसाठी
पाणी लागते वेळोवेळी
पाण्याविना कोणी
जगूच शकत नाही
पाणी म्हणजे जीवन
नाकारता येत नाही
ऐका सकल जन
महत्त्व याचे जाणूनी
संरक्षण व संवर्धन
करूया सर्वांनी मिळूनी
